औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभाचा डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी आढावा घेतला. या समारंभाची जोरदार तयारी विद्यापीठात सुरू आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा हा सोहळाऑनलाईन पद्धतीने होणार आहे.यावर्षी 61 वा दीक्षांत समारंभ 25 जूनला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन, डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांची उपस्थिती होती.
डॉ. येवले म्हणाले, ‘या वर्षीचा दीक्षांत समारंभ ऑनलाइन घेण्याचे निर्देश आहे. राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम होत असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे यावर्षीच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
राजभवनच्या प्रोटोकॉलनुसार सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व सदरप्रोफेशनल पद्धतीने होणार आहे. सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध 14 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यंदा 430 संशोधकांना पी.एच.डी. देण्यात येणार आहे. 10 जूनपर्यंत 430 संशोधकांनी पीएच. डी. पदवीसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये कला आणि सामाजिकशास्त्रे -174, विज्ञान व तंत्रज्ञान -130, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र -59 व आंतरविद्या शाखेच्या 67 संशोधकांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभ सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत होणार आहे. यावेळी पीएच. डी. संशोधकांना प्रत्यक्ष वितरण न होता ऑनलाइन पद्धतीने नाव वाचन होणार आहे.