बंगरुळु |जेष्ठ विचारवंत डॉ. एम एम कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना गणेश मिस्कीन आणि प्रवीण चतुर या दोन व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमा देवी आणि अन्य साक्षीदारांना पोलिसांच्या समक्ष ओळखले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कलबुर्गी हत्याप्रकरणी कर्नाटक एसआयटीच्या तपासामध्ये महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी चोरीची दुचाकी वापरल्याचीही माहिती समोर आली आहे. आरोपींची ओळख पटल्याने आता या हत्याप्रकरणातील मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होऊ शकते. ३० ऑगस्ट २०१५ रोजी डॉ. एम एम कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, कलबुर्गी हत्या प्रकरणी संशयित आरोपीला बेळगावातून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन २७ वर्षीय प्रवीण प्रकाश चतुरला अटक केली होती. कलबुर्गी हत्या प्रकरणातील पहिली अटक असून अमोल काळे याच्या जबाबातून प्रवीणचं नाव समोर आलं. गौरी लंकेश हत्येनंतर कलबुर्गी हत्येमागे बेळगाव कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय होता.