कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
इंडो श्रीलंकन एज्युकेशनल समिट नुकतीच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पार पडली. या कार्यशाळेत विविध शैक्षणिक योजना व शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा करण्यात आली. श्रीलंकेच्या संसदेच्या बंदरनायके मेमोरियल आंतरराष्ट्रीय सभागृहात ही परिषद संपन्न झाली. यावेळी श्रीलंकेचे शिक्षण मंत्री डॉ. अरविंद कुमार यांच्या हस्ते इंडो श्रीलंका एज्युकेशन समिट मध्ये डॉ. महेश खुस्पे यांचा आंतराष्ट्रीय शिक्षा उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या समिटमध्ये कोटा अकॅडमीच्या वतीने संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध बदल व त्यावर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. त्यावर श्रीलंकेच्या अनेक मंत्री व खासदार यांनी महेश खुस्पे यांचा सन्मान केला. तसेच श्रीलंकेच्या सायन्स व तंत्रज्ञान मंत्री श्री विजयदेशा राजपाक्षे यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिल्याबद्दल डॉ. महेश खुस्पे यांचे विशेष आभार मानले. आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
कराड येथील कोटा कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्याचे काम करत आहेत. डाॅ. महेश खुस्पे आणि मंजिरी खुस्पे यांनी ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील तसेच परदेशातील शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे.