व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डॉ. कराडांच्या ‘त्या’ कृत्याचे मोदींनी केले कौतुक

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे कौतुक केले आहे. विमान प्रवासादरम्यान रक्तदाब कमी झाल्यामुळे एक प्रवासी सीटवरुन खाली पडला होता. प्रोटोकाॅल बाजूला ठेवून कराड यांनी प्रवाशावर उपचार केले होते. त्या प्रवाशाचा जीव वाचवला. यामुळे मोदी यांनी कराड यांचे कौतुक केले आहे.

मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझे सहकारी डाॅ भागवत कराड पेशानेचं नाहीतर हृदयानेही डाॅक्टर आहेत. सहप्रवाशाची मदत करुन त्यांनी चांगला संदेश दिला आहे. मदत केल्यानंतर कराड आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या घटनेविषयी लिहितात, की आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते, तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते. याची काल परत एकदा अनुभूती घेतली.

सदरील विमान इंडिगो कंपनीचे होती. कंपनीनेही कराड यांचे आभार मानले आहे. राज्यमंत्री कराड यांनी कौतुकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. कराड म्हणतात, तुमच्या मार्गदर्शनाखाली सेवा आणि समर्पणातून लोकांची सेवा करतोय. जय हिंद!