हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबर 2024 ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियमला मिसेस इंडिया सुपर नॅशनल 2024 ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. झोया सिराज शेख यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आठ राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिलांनी भाग घेतला होता ज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर रसिका राजीव गोंधळे (Dr. Rasika Gondhale) यांनी फर्स्ट रनर अप विजेत्या हा मान पटकावला.
डॉक्टर रसिका गोंधळे या जनरल सर्जन असून सध्या गोविंदराव वंजारी आयुर्वेद कॉलेज आणि रिसर्च सेंटर नागपूर येथे डेप्युटी मेडिकल सुपरटेंडंट म्हणून कार्यरत आहेत सोबतच नागपूर दूरदर्शन ला “आरोग्य संपदा” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील करतात. अभिनयाची आवड असल्याने त्या एक थेटर आर्टिस्ट असून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत आणि व्यावसायिक नाटकांमध्ये देखील काम करत असतात.
सौंदर्य स्पर्धांमध्ये तसेच मिसेस भंडारा 2017, मिसेस नागपूर 2018, मिसेस विदर्भ 2019, मिसेस महाराष्ट्र 2023 हा मान पटकाविला आहे. त्यांची कारकीर्द बघता लोकमत तर्फे सखी सन्मान अवार्ड 2017, राणी लक्ष्मीबाई आवड 2022, टॅलेंट अवर्ड 2023, ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया अवॉर्ड 2024, याने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, मिसेस इंडिया सुपर नॅशनल च्या विजेत्या होऊन यापुढे मिसेस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत त्या भारताचे प्रतिनिधित्व करतील