तांबवे येथील डाॅ. शलाका पाटील यांना IISER विद्यापीठातून पीचडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (IISER, Pune) या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राप्त केली. डॉ. शलाका यांचा शोधप्रबंध “Role of Lamin B Receptor in nuclear organization and chromosomal stability” हा असून त्यांना डॉ. कुंदन सेनगुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. श्रीमंत गायन (IISc. Bangalore) आणि प्रो. जोआना ब्रिजर (Brunel University, London) हे बाह्यपरीक्षक होते. तसेच डॉ. मयुरिका लहीरी आणि डॉ. ऋचा रिखी यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. शलाका यांची मौखिक परीक्षा पार पडली. डाॅ. शलाका यांचे संशोधन आतड्याच्या कॅन्सर मधील पेशींच्या गुणसूत्रे तसेच जनुकीय बदलांवर आधारित आहे. कॅन्सरच्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या असंतुलित होते आणि हा गुणसूत्रांचा बदल कॅन्सर पेशींच्या वाढीसाठी अनुकूल होतो. Lamin B Receptor ह्या पेशींकेंद्रक पटलावरील प्रथिनांमुळे गुणसूत्रांची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. परिणामी, LBR जनुकांची अभिव्यक्ती ही ट्युमर उत्पादनासाठी प्रतिकूल आहे. या संशोधनामुळे आतड्याच्या कर्करोगावरील मूलभूत संशोधनासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे.

डॉ. शलाका यांचे संशोधन कार्य ह्यूमन मॉलेक्यूलर जेनेटीक्स या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. डॉ. शलाका यांचे शालेय शिक्षण भारती विद्यापीठ मध्ये झाले असून त्या पुणे विद्यापीठातून M.Sc. मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रथम आल्या होत्या. तसेच CSIR-UGC नेट परीक्षेमध्ये त्यांचा देशामध्ये 22 वा नंबर आला होता. डॉ. शलाका यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी.

डाॅ. शलाका पाटील यांचे कुटुंबियांची भक्कम साथ
डाॅ. शलाका यांच्या आई सौ. शारदा या मुख्याध्यापिका व वडील तात्यासाहेब पाटील ज्येष्ठ शिक्षक म्हणून भारती विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ. शलाका यांच्या शैक्षणिक कार्यकीर्दीबद्दल पती राज गुलाबराव शिंदे (Sr. soft engineer, NICE) यांनी भक्कम साथ दिली.