अंधेरी पोटनिवडणुकीत RPI चा पाठिंबा कोणाला? आठवलेंनी केलं जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यांनतर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि आरपीआयचा विजय होईल, उद्धव ठाकरेंची मशाल आम्ही विजवू असेही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले,अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे. उद्धव ठाकरे यांची मशाल जरी पेटवलेली दाखविण्यात आली असली तरी या निवडणुकीमध्ये ही मशाल विझविण्याचं काम आम्ही करणार आहोत. मशाल वीजवायची आणि भाजपचं कमळं फुलंवायचं आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे गट, भाजप आणि आरपीआय एकत्र आहे. आमची महायुती या निवडणुकीत मजबूत असून आम्ही ही निवडणूक नक्की जिंकणार असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

दरम्यान, दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील राजीनामा अद्याप प्रशासनानं स्वीकारलेला नाही यामागे सरकारचा कोणता दबाव आहे का ? असा सवाल केला असता आठवले म्हणाले, राजीनामा नियमानुसार आधी द्यावा लागतो. याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. हा प्रश्न अधिकारी लेव्हलचा आहे. यात सरकारचा दबाव आणण्याचा प्रश्न काही येत नाही.