हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशभरात IPL स्पर्धा सुरू असून तरूणाई ऑनलाइन अँप Dream 11 च्या माध्यमातून आपल नशीब चमकवू पाहत आहेत. ड्रीम 11 मध्ये अनेक जणांनी आपल्या कौशल्याने आणि क्रिकेटच्या ज्ञानाच्या जोरावर भरपूर पैसा कमावला आहे. कराड तालुक्यातील कालेटेक या गावातील युवकाने तर ड्रीम 11 मध्ये चक्क 1 कोटी रुपयांची रक्कम जिंकली आहे.
सुहास यादव असे या नशीबवान युवकाचे नाव आहे. गुजरात लायन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट या सामन्यात सुहासने ड्रीम 11 वर आपली टीम लावली होती. 1 कोटी 19 लाख 72 लोकांच्यात सुहासने पहिला क्रमांक मिळवला आणि 1 कोटी रूपये जिंकले. TDS कपात होऊन त्याच्या ड्रीम 11 खात्यावर 84 लाख रुपये जमा झाले.
सुहास ड्रीम 11 च्या माध्यमातून करोडपती झाल्याचे समजतात त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. दरम्यान, आयुष्यातील काही स्वप्ने पैशामुळे अपुरी होती ती आता पूर्ण करेल अशी प्रतिक्रिया सुहासने जिंकल्यावर दिली.