औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंशतः लॉकडाऊन सुरू असताना शहरात दारू दुकाने आणि मध्यपिना वेळेचे आणि कोरोनाचे नियम लागू नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या वर कारवाई होणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नसल्याने रस्त्यावरच हे मध्यपी पहाटे पासूनच ओढ पाचची चा कार्यक्रम सुरू करतात.
देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने उघडणे व बंद करण्यासाठी प्रशासनाने नियम ठरवून दिलेले आहेत. मात्र शहरातील बहुतांश भागातील दारू दुकाने वेळेच्या आधी छुप्या पद्धतीने पहाटेपासूनच सुरू असतात या दुकानावर मध्यपीची रेलचेल असते. मध्यपी दुकानातून दारूची बाटली घेऊन जागा मिळेल तिथे रस्त्यावर दारू पित असतात. या मुळे स्थानिक रहिवाशांना या मध्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे.
दारू पिताना जोरजोरात ओरडणे, भांडण करणे, अति मद्य प्राशन करून रस्त्यावर झोपणे असे त्रास नित्याचेच झाले असून राहिवश्यनी हटकले तर हे मद्य पी थेट भांडण करतात त्यामुळे नागरिक देखील हा तोंड दाबून मुक्याचा मार सहन करतात. प्रामुख्याने जलनारोड, मुकुंदवाडी, रेल्वेस्थानक परिसर,नारेगाव , आशा विविध भागात अवैध रित्या होत असलेल्या दारूविक्री ला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नसल्याने गल्लीबोळात अवैध दारूचे अड्डे बोकाळले आहे.
—————————
मोंढा उड्डाणपुलाखाली दारुड्यांची मैफिल..
औरंगाबाद-जालना महामार्गावर असलेल्या मोंढानाका उड्डाणपुलाखाली सकाळी 6 वाजेपासूनच मदयपींची रेलचेल सुरू असते हातात एक ग्लास आणि चखना घेऊन या भागात मध्यपी सर्रास पणे दारू रिचवीत असतात.
——————————
अश्या ठिकाणी कठोर कारवाई – पोलीस आयुक्त
नियम मोडणारी दुकाने, आणि रस्त्यावर कोणी दारू पित असेल तर अशावर कठोर कारवाई केली जाईल.तशे आदेश सर्व पोलीस ठाणे स्थरावर देण्यात आले आहे.असे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवा.कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
– डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा