हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याचा धोका वाढलेला आहे. पाणी शरीराच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः शरीरातील सोडियम आणि कॅल्शियमचे प्रमाण सामान्य ठेवण्यासाठी. तहान वाढल्याने पिण्याच्या पाण्याची मात्रा वाढली आहे, पण योग्य प्रमाणात पाणी पिले नाही तर शरीरावर वाईट परिमाण होऊ शकतो. काही लोक उन्हाळा आहे म्हणून जास्त पाणी पितात ,पण अति पाणी पिणे देखील धोकादायक ठरू शकते. तर चला आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे , हे सविस्तर जाणून घेऊयात.
शरीराची हायड्रेशन स्थिती कायम –
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणे हे सामान्य आहे, ज्यामुळे तहान लागते. अशा वेळी पाणी घेतल्यास शरीराची हायड्रेशन स्थिती कायम राहते. याबरोबरच शहाळ्याचे पाणी, फळांचा रस आणि लिंबू सरबत यांचा उपयोग शरीरासाठी आवश्यक असतो, कारण त्यांच्यात पाणी आणि पोषणतत्त्वे भरपूर असतात. आणि ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला –
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, हृदय विकार किंवा किडनीच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी पाणी कमी घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी अधिक पाणी घेणे हृदयावर ताण आणू शकते किंवा मूत्रपिंडांच्या कार्यावर प्रभाव पाडू शकतो. सामान्य नागरिकांनी तीन लिटर पाणी घेणे योग्य ठरते, पण हे पाणी तहान लागल्यावरच प्यायला हवे, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी घेतल्याने डिहायड्रेशन आणि ओव्हर डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.




