सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
चोरीच्या गुन्हयामधील आरोपीस औंध पोलीसांनी 15 लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.
अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर व दोन ट्रॉली हा 10 जानेवारीला चोरी गेले बाबत औध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात दाजी ऊर्फ भागवत धुळा खरात (वय – 42 वर्षे, रा. चाकुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औंध पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर आणि ट्राॅली चोरीला गेल्याची फिर्याद ट्रॅक्टर मालकाने दिली होती. त्यानंतर गोपनीय बातमीदारा मार्फत तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयीत आरोपीची ओळख पटवून त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी ट्रॅक्टरवर ड्रायव्हरने सदरील चोरी केली होती. सदर आरोपीस माळशिरस येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयित आरोपीस गुन्हयात अटक करून त्याचेकडून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर किंमत 9 लाख रूपये आणि 6 लाख रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रैक्टर व दोन ट्रॉली याची एकूण किंमत 15 लाख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.