Mumbai rave party: NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री; करणार ‘हा’ तपास

0
84
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील समुद्रात क्रूझवर आयोजित करण्यात आलेली ड्रग्ज पार्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावली. यामध्ये आत्तापर्यंत 11 जणांना ताब्यात घेतलं असून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा देखील सध्या कोठडीत आहे. आर्यन खानसह त्याच्या सहकाऱ्यांकडे अंमली पदार्थ सापडल्याचा आरोप आहे. याप्रकरणाची चौकशी समीर वानखेडे आणि NCB करत असताना आता मुंबई पोलिसांची एण्ट्री झाली आहे.

कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत क्रूझवर बरीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि कुणीही मास्क परिधान केलेला नव्हता. याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची तिथं उपस्थिती होती. मग याची परवानगी कुणी दिली? याचा तपास मुंबई पोलीस करेल.

क्रूझवर पार्टीसाठी मुंबई पोलिसांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मुंबई पोलिसांना परवानगीसाठी कोणतेही लेखी पत्र किंवा क्रूजवरील पार्टीबद्दल मुंबई पोलिसांना कोणतीही सूचना दिलेली नव्हती. जहाजाला कोणती परवानगी देण्यात आली याबद्दल मुंबई पोलीस डीजी शिपिंग आणि एमबीपीटीशी बोलणार आहेत. सध्या राज्यात कोव्हिड -19 मुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे. कलम 188 चे कोणतेही उल्लंघन झालं आहे का याचाही तपास करण्यात येणार आहे, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here