हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drumstick Benefits) बरेच लोक आवडीने शेवग्याच्या शेंगांची भाजी खातात. शिवाय शेवग्याच्या शेंगा विविध पदार्थांमध्येदेखील वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. खायला चविष्ट अशा या शेंगा आरोग्यासाठी बऱ्याच फायदेशीर असतात. आयुर्वेदातही शेवग्याच्या शेंगाना विशेष स्थान आहे. कारण शेवग्याच्या भाजीतील बरेच घटक हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात. तज्ञ सांगतात की, शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने ३०० पेक्षा जास्त आजरांपासून संररक्षण मिळते.
शेवग्याच्या शेंगांमधील आरोग्यदायी गुणधर्म
शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्फोरस, जिंक यांसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक समाविष्ट आहेत. (Drumstick Benefits) शिवाय या शेंगांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B१, व्हिटॅमिन B२, व्हिटॅमिन B३, व्हिटॅमिन B४, व्हिटॅमिन B६, व्हिटॅमिन B९ आणि व्हिटॅमिन C देखील बऱ्याच प्रमाणात आढळते. चला तर शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यास कोणकोणते आरोग्यदायी फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
1. रक्त शुद्धीकरण (Drumstick Benefits)
शेवग्याच्या भाजीप्रमाणे त्याच्या पानांमध्ये देखील असे अनेक गुणकारी घटक असतात. जे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करते. यातील काही घटक अँटी बायोटीक एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ वाढून होणारे सर्व त्रास दूर होतात.
2. मधुमेहींसाठी फायदेशीर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगा खाणे बरेच फायदेशीर मानले जाते. (Drumstick Benefits) या भाजीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहींचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
3. उच्च रक्तदाब
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांसाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी खाणे वरदान मानले जाते. त्यामुळे अशा लोकांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा सूप याचा समावेश चांगला मानला जातो.
4. श्वासासंबंधीत समस्या होतील दूर कार
ज्या लोकांना श्वसन संदर्भात कोणतीही समस्या असेल त्यांनी आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगाचे सेवन करावे. (Drumstick Benefits) यामुळे कफ, श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या दूर होतील आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारेल.
5. इन्फेक्शनपासून संरक्षण
शेवग्याच्या भाजीची पाने आणि फुले अँटी बॅक्टेरियल घटकांनी परिपूर्ण असतात. यामुळे फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो आणि इन्फेक्शन तसेच आजारांपासून बचाव होतो.
6. हाडं होतील मजबूत
शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. (Drumstick Benefits) ज्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी ही भाजी खाणे फायदेशीर ठरते.
7. लठ्ठपणावर नियंत्रण
शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा अत्यंत फायदेशीर आहेत. या भाजीतील फॉस्फोरस शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी करतात आणि लठ्ठपणा दूर करायला मदत करतात.