डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये एक विचित्र अपघात (accident) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी 4 च्या सुमारास दारूच्या नशेत असणाऱ्या एका चारचाकी वाहनचालकाने उभ्या असलेल्या सहा ते सात गाड्यांना धडक (accident) दिली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये 5 दुचाकी आणि 2 रिक्षांचा समावेश आहे. तसेच या कारने एका डीपीलाही धडक दिली आहे. कार चालकाचा वेग इतका भीषण होता की उभ्या असलेल्या रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नीलकंठ पटवर्धन असे दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या कार चालकाचे नाव आहे. नागरिकांनी या कार चालकाला पकडून विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
गाडीवरील नियंत्रण सुटले
कार चालक नीलकंठ पटवर्धन हा उमेश नगरमधीलच रहिवासी असून, गुरुवारी रात्री तो घरी चालला होता. यावेळी तो नशेत फुल तर्र होता. दारुच्या नशेतच गाडी चालवत होता. नशेत असल्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित (accident) झाली. आपल्या अनियंत्रित कारने त्याने रस्स्त्यावर उभ्या असलेल्या सात वाहनांना उडवले. यात एका रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. यात इतर गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व वाहनचालकांनी विष्णुनगर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सध्या हा वाहन चालक पूर्णपणे नशेत असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक
मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात हा अपघात (accident) झाला. या अपघातात गुजरातहून रत्नागिरीकडे जाणारी बलेनो कार व कुसगावहून महाडकडे येणारी आय 20 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये 2 लहान मुलांसह चौघेजण जखमी झाले होते.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!