Ducati Monster SP अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच; फीचर्स आणि पॉवर बघून नक्कीच भुरळ पडेल

Ducati Monster SP
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटालियन टू-व्हीलर उत्पादक डुकाटीने आपल्या टूरर बाइक Ducati Monster SP चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. आकर्षकी लूक आणि दमदार इंजिन पॉवरने सुसज्ज असलेल्या या बाईकची किंमत कंपनीने 15.95 लाख रुपये ठेवली आहे. नवीन अपडेटेड Ducati Monster SP भारतीय बाजारपेठेत कावासाकी Z900, Triumph Street Triple R आणि BMW F900R यासारख्या गाड्यांना तगडी फाईट देईल. आज आपण जाणून घेऊया तरुणाईच्या मनावर भुरळ घालणाऱ्या या टूरर बाईकची खास वैशिष्टये ….

लूक आणि डिझाईन –

डुकाटीच्या (Ducati Monster SP) या नव्या बाईकच्या लूकबद्दल सांगायचं झाल्यास दिसायला ती सध्याच्या स्टँडर्ड मॉन्स्टर बाईक सारखी दिसते. पण गाडीचे वजन हे आधीच्या मॉडेलपेक्षा थोडे कमी आहे. यामध्ये तुम्हाला मोटोजीपी सारखेच ब्लॅक-आउट पार्ट आणि पॅसेंजर सीट काउल पाहायला मिळतात. सीटची उंची 840 मिमी आहे. सस्पेंशन युनिटमधील बदलामुळे बाईक आकाराने लांब झाली आहे. दुकाटीच्या या अपडेटेड व्हेरिएन्ट मध्ये 17-इंचाचे अलॉय व्हील पाहायला मिळत आहेत.

इंजिन – (Ducati Monster SP)

बाईकमध्ये 937cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेलं असून 9,250 rpm वर 111 hp आणि 6,500 rpm वर 93 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. Ducati Monster SP चे टॉप स्पीड 205 किमी/ प्रतितास असून ही बाईक 18.8 km/l मायलेज देण्यास सक्षम आहे. गाडीचे वजन 186 किलोग्राम असून आधीच मॉडेलपेक्षा २ किलोग्रॅम कमीच आहे.

फीचर्स-

बाईकच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 4.3-इंचाचा कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कॉर्नरिंग ABS, LED लाइटिंग सेटअप, 17-इंच मिक्स अलॉय व्हील यांचा समावेश आहे.गाडीच्या मागील बाजूस ओहलिन्सचे रिअर मोनोशॉक सस्पेंशन तसेच गाडी कंट्रोल व्हावी म्हणून ब्रेकिंगसाठी 320 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

हे पण वाचा :

Simple One इलेक्ट्रिक स्कूटर या दिवशी लाँच होणार; Ola ला देणार तगडी फाईट

हवेत उडणारी Electric Car बाजारात दाखल; पहा किंमत आणि वैशिष्टये

KTM 390 Adventure X : KTM ने लाँच केली सर्वात स्वस्त टूरर बाइक; किंमत आणि फीचर्स पहा

Ather 450X चे नवीन बेस व्हेरियंट लाँच, 146 KM रेंज; किंमत किती?