औरंगाबाद : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे एका तरुणाने जिल्ह्यात स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.५ मे रोजी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्रभर मराठा समाजातील नागरिकांमध्ये निराशा जनक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मराठा राजकीय नेते त्याबरोबरच मराठा समाजातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
अशात औरंगाबाद शहरातील फुलंब्री तालुक्यातील तरुण मंगेश साबळे (वय 24) याने आत्मदहन करण्याच्या प्रयत्न केला आहे. मंगेशने यापूर्वी फेसबुकद्वारे लाइव्ह करत म्हणाला होता की, “येत्या ३१ मे पर्यंत जर मराठा आरक्षणावर काही निर्णय घेतला नाही तर, मी संविधानीक ठिकाणी जाऊन आत्मदखान करेल” असा इशारा त्याने सरकारला दिला होता.
त्यानंतर मंगेशने फेसबुक लाईव्हवर बोलल्या प्रमाणे आज सकाळी तो आत्मदहन करण्यास जाणार होता. तेव्हा तो जात असताना वडोद बाजार पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्परता दाखवत त्याला सावंगी नाका येथून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे होणारी दुर्घटना टाळली आहे.
यापूर्वीही जिल्हयात आरक्षणासाठी आत्महत्या :
कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर सर्व मराठा समाजातून संताप व्यक्त केला गेला, नागरीक आक्रमक झाले होते. त्यानंतर मराठा आरक्षण मागणीसाठी वेग आला होता.




