पाचगणी नगरपालीकेच्या नाकर्तेपणामुळे ऐतिहासिक गोडवलीचा रस्त्याच प्रश्न जटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी : पाचगणी नगरपालीकेच्या स्वमालकीच्या असलेल्या टेबललॅड जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार असुन देश विदेशातुन जागतिक पर्यटनस्थळाला हजारो पर्यटक भेट देत असतात त्यामुळे बहुचर्चित टेबललॅडच्या विकास आराखड्यास मंजुर होणे अत्यावश्यक होते . पाचगणी टेबललॅडबाबत लोकनियुक्त दाखल केलेल्या याचिकेच्या आदेशानुसार पाचगणी नगरपालिकेने पाचगणी टेबलॅडचा विकास आरखडा प्रस्तावातील केला आहे .उच्चन्यायालयाकडुन गठित करण्यात आलेल्या उच्च सनियंत्रण समितीकडुन अंतिम मंजुरी घेवुनच पाचगणीच्या नगरपालीकेकडुन २ कोटी ५१ लाख रुपायाच्या अंतिम अंदाजपत्रकास मजुंरी मिळाली आहे मात्र नगरपालीेकेचा भरमसाठ खर्च फक्त साठमारीकरीता आहे का ?टेबललॅंडच्या कुशीत गोडवली हे ऐतिहासिक गाव वसले असून, या गावाला पाचगणीहून पायी जाण्यासाठी टेबललॅंडवरून जावे लागते. हा रस्ता सध्या झाडे, झुडपे, गवताने माखला असल्याने चालणेही मुश्‍किलीचे होत आहे,पाचगणी शहरातील पर्यटनस्थळांकडे जाणारे पायरस्ते झुडपांनी अतिक्रमित केले असल्यामुळे पर्यटकांना तसेच पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत पाचगणी नगरपालीकेची कोणतीच भुमीका नसल्याने टेबललॅडचा विकास नगरसेवकांच्या टक्केवारीकरीता का ? असा प्रश्न सर्वसामान्यानकडुव व्यक्त होत आहे . या रस्त्यांवरील झुडपे पालिकेने हटवून रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळे लॉक केली आहेत. तरीसुद्धा जिल्हाबंदी उठल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळांवर येत आहेत. पर्यटनस्थळांवर प्रतिबंध असला तरी या स्थळांशेजारी जावून पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

टेबललॅंडचे पठार हे पर्यटकांचे आकर्षण आहे आणि पाचगणी हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. या स्थळावर नाक्‍यापासून जाण्यासाठी नागमोडी वळणाचा रस्ता आहे. परंतु, पायी जाणाऱ्या पर्यटक व नागरिकांसाठी सेंट कॉन्व्हेंन्ट स्कूलच्या जुन्या गेटपासून चढणीच्या पायऱ्या आहेत. या दगडी पायऱ्या आजूबाजूच्या झुडुपांनी अतिक्रमित केल्या आहेत. ही काटेरी झुडपे येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी व पर्यटकांना अडथळा निर्माण करीत आहेत. ही झुडपे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ओरबडत आहेत. त्यामुळे ही झुडपे तातडीने पालिकेने काढून पायऱ्यांचा रस्ता निर्धोक करावा, अशी मागणी येथील पर्यटक व नागरिकांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment