E-Commerce : खुशखबर !!! ‘या’ सरकारी वेबसाइटवर स्वस्त दरात खरेदीची संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । E-Commerce : शॉपिंगची आवड सर्वांनाच असते असे नाही. आजकाल शॉपिंगसाठी अनेक ई-कॉमर्स साईट्स उपलब्ध आहेत. ज्याद्वारे आपल्याला अनेक चांगल्या ऑफर्स देखील मिळतात. आज आम्ही तुम्हांला एका अशा प्लॅटफॉर्मबाबत माहिती देणार आहोत जिथे स्वस्तात अनेक दर्जेदार प्रॉडक्ट्स मिळतील. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Gem

Gem ही एक सरकारी वेबसाइट आहे. या वेबसाइटवर जवळपास असे 10 प्रॉडक्ट्स आहेत जे स्वस्त दरात उपलब्ध आहेत. तसेच हे प्रॉडक्ट्स इतर वेबसाइट्सवर थोड्या जास्त किंमतीला मिळत आहेत.

Gem वेबसाइटवर अगदी परवडणाऱ्या किंमतीत अनेक प्रॉडक्ट्स मिळतात. एका आर्थिक सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे. या सरकारी पोर्टलवर असे 10 प्रॉडक्ट्स आहेत जे इतर ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. E-Commerce

Gem

आता तुम्हांला वाटत असेल कि इतके स्वस्त मिळत असल्यामुळे या प्रॉडक्ट्सची क्वालिटी खराब असेल. तर हे लक्षात घ्या कि, या वेबसाइटद्वारे ऑफर केले जाणारे सर्व प्रॉडक्ट्स चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली गेलेली नाही.

या आर्थिक सर्वेक्षणादरम्यान अशा एकूण 22 प्रॉडक्ट्सची तुलना करण्यात आली, ज्यांची किंमत इतर साइटच्या तुलनेत 9.5 टक्के कमी होती. हा मोठा फरक असून याद्वारे ग्राहकांचे बरेच पैसे वाचू शकतील. E-Commerce

हे पण वाचा :

Amazon ची फ्रेंचायसी घेऊन पैसा कमवा.. असं म्हणत लाखोंना लुबाडलं

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन