नवी दिल्ली | येत्या काही दिवसात राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच ई-नाम प्लॅटफॉर्मला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. 14 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- नामची सुरुवात केली होती. केंद्र सरकारने आजपर्यंत 585 बाजार समित्या ई-नाम सोबत जोडल्या आहेत. सोबतच 2021 मध्ये या कोर्टाचा अजून जास्त विस्तार करण्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. तसेच, या पोर्टलचा उपयोग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी होणार असल्याचेही ते म्हणाले.
इनाम योजनेचा आणि सोबतच या योजनेसाठी बनवण्यात आलेल्या पोर्टलचा 2021 मध्ये विस्तार करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ई-नाम योजनाही लक्ष शेतकरी कृषी व्यापार संघ यांच्याकडून राबवली जाते. सरकार इनाम योजना जवळपास दोनशे बाजार समित्यांमध्ये लागू करणार आहे. पुढील वर्षी 215 बाजार समित्या या ई-नामशी जोडन्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सद्यस्थितीला भारतात एकूण सत्ताविसशे कृषी उत्पन्न बाजार समित्या तर चार हजार बाजार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिकाच्या ऑनलाइन विक्रीसाठी देशभरात कृषी बाजार समित्या म्हणजेच ई-मंडी उघडली. या ई-मंडी’च्या माध्यमातून देशातील विविध राज्यात असलेल्या कृषी उपाज बाजार समितीच्या नावाखाली देशातील 885 बाजार समित्या जोडल्या गेल्या. संपूर्ण देश हा बाजारपेठ बनला पाहिजे असे या योजनेचे ध्येय आहे. देशातल्या ोणत्याही कोपऱ्यातील शेतकर्याला आपले उत्पादन कोणत्याही कोपऱ्यात घेऊन ई-नाम योजनेमुळे विक्री करणे सोपे झाले आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group