नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रूपी (e-RUPI) लाँच केले. हे एक पर्सन आणि पर्पज स्पेसिफिक डिजिटल पेमेंट सॉल्युशन (Digital Payment Solution) आहे. e-RUPI लाँच केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की,”या डिजिटल पेमेंट सोल्यूशनमुळे गरिबांना कोरोना लस मिळण्यास मदत होईल.” जून 2021 मध्ये केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी शुल्क निश्चित केले होते. यानंतर, सरकारने म्हटले होते की, खाजगी रुग्णालये गरीबांचे लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी ई-व्हाउचर देखील आणतील. e-RUPI हेच इलेक्ट्रॉनिक व्हाउचर आहे.
QR कोड किंवा SMS स्कॅन केले जातील
कोणतीही व्यक्ती कोणत्याही गरीब व्यक्तीला e-RUPI जारी करू शकते. हे नॉन-ट्रांसफरेबल ई-व्हाउचर तेच लाभार्थी वापरू शकतात ज्यांच्यासाठी ते जारी केले गेले आहे. e-RUPI लाभार्थीच्या मोबाईलवर पाठवला जाईल. हे क्यूआर कोड किंवा SMS कोडच्या स्वरूपात असेल. ते खासगी लसीकरण केंद्रांवर स्कॅन केले जातील. वेरिफिकेशनसाठी लाभार्थीच्या मोबाईल क्रमांकावर एक कोड पाठविला जाईल. वेरिफिकेशन केल्यावर, व्हाउचर रिडीम केले जाईल आणि पेमेंट केले जाईल. कॉर्पोरेट खाजगी केंद्रात गरीबांना लस मिळवण्यासाठी मदत करू शकतात. सरकारी संस्था किंवा कोणतीही सर्विस प्रोवायडर त्यांच्या भागीदार बँकांच्या मदतीने e-RUPI व्हाउचर तयार करू शकतात.
अनेक सर्विस साठी वापरले जाऊ शकते
e-RUPI हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस टूल आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर डिलिव्हर केले जाते. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पार्टनर बँका आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले आहे. माता आणि बालकल्याण योजना योजनांअंतर्गत औषधे आणि न्यूट्रीशनल यासारख्या मदत उपलब्ध, करून देणारे टीबी निर्मूलन कार्यक्रम, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ड्रग्स व डायग्नॉस्टिक्स खत अनुदान सारख्या सर्विस पुरवण्यासाठी देखील e-RUPI चा वापर केला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्र देखील त्यांच्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाउचरचा लाभ घेऊ शकतात.