मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एक नवी संधी उपलब्ध होणार आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच मुंबईच्या समुद्रावर धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी या पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबविणार असून, ही सेवा त्वरित सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
ई-वॉटर टॅक्सी कोणत्या मार्गांवर धावणार?
गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग अशा मर्गावर या टॅक्सी धावणार आहेत. या सेवेच्या माध्यमातून मुंबईतील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार असून, प्रवासाचा वेगवान आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांसाठी किती सोयीस्कर?
प्रत्येक ई-वॉटर टॅक्सीमध्ये २५ प्रवासी प्रवास करू शकतील.
६४ किलोवॅट क्षमतेची बॅटरी असणार आहे, जी संपूर्णतः इलेक्ट्रिक असेल.
तिकीट दराच्या बाबतीत सांगायचं झाल्यास राज्य सरकारने वॉटर टॅक्सीच्या किमती सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पर्यावरणपूरक वाहतूक आणि भविष्यातील योजना
ई-वॉटर टॅक्सी सेवा पूर्णतः इको-फ्रेंडली आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या वाहतुकीस नवीन दिशा देणार आहे. दिल्लीमध्येही लवकरच वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणारआहे, जिथे यमुना नदी स्वच्छ करून जलवाहतूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.