Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत

Earn Money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्याला आवडलेल्या अनेक गोष्टींचे फोटो काढतो. जे आपण नंतर सोशल मीडियावर अपलोड करतो. कित्येक फोटो मोबाईलमध्ये असेच पडून राहतात. मात्र जर आपल्याला या फोटोंद्वारे पैसे कमवता आले तर… होय तुम्ही अगदी बरोबर वाचलंत… आपल्याला मोबाईल फोटोग्राफीद्वारे पैसे कमवता येतात. याची माहिती आपल्यातील अनेकांना नाही. तर आजच्या या बातमीमध्ये आपण मोबाइलवरून फोटो काढून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेउयात…

Foap.com: Tailor-made video & imagery crowdsourced from 3M creatives.

आज आपण ज्या प्लॅटफॉर्मबाबत जाणून घेणार आहोत त्याचे नाव आहे Foap. हे एक लोकप्रिय फ्री-टू-डाउनलोड App आहे. याद्वारे आपल्याला स्मार्टफोनवरून फोटो आणि व्हिडिओ विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिले जाते. वापरण्यास अतिशय सोपे असलेले हे ऍप Android आणि iOS वर देखील उपलब्ध आहे. Earn Money

6 tips on how to sell on Foap | Foap Community

यासाठी सर्वात आधी हे ऍप डाउनलोड करावे लागेल. यानंतर त्यामध्ये आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर, आपल्याला जे फोटो विकायचे आहेत ते थेट आपल्या फोनवरून अपलोड करावे लागतील. यासाठी आपल्याला कोणत्याही वेबसाइटला भेट देण्याची गरज भासणार नाही. यामध्ये आपले फोटो अपलोड करण्यासाठी या ऍपमधील कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे लागेल. तसेच यानंतर जे फोटो अपलोड करायचे असतील त्याची निवड करावी लागेल. Earn Money

Foap वर दोन पद्धतीने मोबाईल फोटो विकून पैसे कमवता येतील.

मार्केट –

जेव्हा एखादा खरेदीदार खरेदी करण्यासाठी फोटो सर्च करतो, तेव्हा ते त्याला इथेच दिसतील. याद्वारे जर कोणी आपला फोटो $10 ला विकत घेतला तर आपल्याला $5 मिळतील. Earn Money

How are winners chosen? | Foap Community

मिशन-

ही एक स्पर्धा आहे, ज्यामध्ये सर्व फोटोग्राफर्सना एक फोटो सबमिट करावा लागेल. यानंतर कंपनीने निवडलेल्या विजेत्याला $100USD किंवा त्याहून जास्त पैसे दिले जातील.
मात्र इथे हे लक्षात घ्या कि, यामधील प्रत्येक मिशन वेगवेगळे असते, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या आवश्यकता, बक्षीसाची रक्कम आणि कॉपीराइटच्या अटी असतील.
तसेच यामध्ये Paypal च्या माध्यमातून पैसे दिले जाईल. Earn Money

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.foap.com/

हे पण वाचा :
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
कोणत्या Income Tax Slab अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना किती कर भरावा लागेल ??? जाणून घ्या सर्व तपशील
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 9% पर्यंत व्याज
Gold Price : विक्रमी उच्चांकावरून घसरले सोने, सध्याच्या यामध्ये गुंतवणूक करावी का ??? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत