हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : सध्याच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येते आहे. याबाबतीत दररोज नवनवीन बातम्या ऐकायला मिळत आहेत. मात्र जर कधी आपल्यावर ही परिस्थिती ओढवली तर… असा विचार जरी मनात आला तरी घाबरायला होईल. यामुळेच आपल्याकडे नियमित उत्पन्नाचा एखादा पर्यायी स्रोत तयार ठेवायला हवा. यासाठी आपल्याला इतर कुठेही काम करायची गरज नाही. याकामी आपले साठवलेले पैसे वापरता येईल. होय असा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे ज्याद्वारे आपल्याला निश्चित उत्पन्नासह सुरक्षिततेची गॅरेंटी देखील मिळेल. पोस्ट ऑफिसची मंथली पेन्शन स्कीम (MIS) यासाठी कमी येईल.
आता तर त्याअंतर्गत मिळणारे पेन्शन/उत्पन्नही (Earn Money) वाढले आहे. आता गुंतवणुकीची मर्यादा जवळपास दुप्पट करण्यात आली आहे, त्यामुळे उत्पन्नही वाढले आहे. ही योजना काय आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ते जाणून घेउयात…
या योजनेबाबत माहिती जाणून घ्या
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. याआधी ही रक्कम फक्त 4.5 लाख रुपये इतकी होती. या योजनेमध्ये कोणत्याही सिंगल अकाउंटमध्ये गुंतवणूक करून 5,325 रुपयांची मासिक पेन्शन मिळेल. तसेच जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करून 8,875 रुपये मासिक पेन्शन मिळू शकेल. यामध्ये दोन्ही खातेदारांना समान वाटा मिळेल. यामध्ये 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर हे उत्पन्न मिळू लागेल. Earn Money
कोणा-कोणाला गुंतवणूक करता येईल ???
कोणताही प्रौढ भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणूक करता येईल. 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने देखील हे खाते उघडता येते. 5 वर्षानंतर त्याला नियमित उत्पन्न मिळू लागेल. यावर केंद्र सरकारकडून सध्या 7.1 टक्के व्याज दर मिळत आहे. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसे बाजारातील जोखमीच्या अधीन नसल्याने आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. ज्यावर निश्चित उत्पन्न देखील मिळेल. Earn Money
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या
FD Rates : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ, तपासा नवीन व्याजदर
Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 60,000% रिटर्न