नवी दिल्ली । आज आपण अशा एका बिझनेस आयडियाबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याची सुरूवात करून पहिल्या दिवसापासून मोठी कमाई करता येऊ शकेल. अमूल या दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याची यावेळी मोठी संधी आहे. वास्तविक, अमूल फ्रँचायझी देत आहे. छोट्या गुंतवणुकीत दर महिन्याला नियमित कमाई करता येते. अमूलची फ्रेंचायझी घेणे हा एक फायदेशीर करार आहे. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे.
2 लाखांपासून सुरू करता येऊ शकतो व्यवसाय
अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी देत आहे. इतकेच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही फारसा जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. याद्वारे व्यवसायाच्या सुरुवातीलाच चांगला नफा देखील मिळू शकतो. फ्रँचायझीच्या माध्यमातून दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र ते आपल्या लोकेशनवर देखील अवलंबून असते.
फ्रँचायझी कशी मिळवायची ?
अमूल दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत आहे. एक अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही दुसरी फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील.
इतके कमिशन मिळेल ?
अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल प्रॉडक्ट्सच्या मिनिमम सेलिंग प्राइसवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर बेस्ड आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रॉडक्ट्सवर 10 टक्के कमिशन देते.
इतकी जागा लागेल
तुम्ही अमूल आउटलेट घेतल्यास, तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असावी. त्याच वेळी, अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी, किमान 300 चौरस फूट जागा असावी.
अर्ज कसा करायचा ?
जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला [email protected] वर मेल करावा लागेल. याशिवाय http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर जाऊनही माहिती घेता येईल.