Earth Green Term Deposits : बँक ऑफ बडोदाने लाँच केली नवी FD स्कीम; मिळेल 7.15 % व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Earth Green Term Deposits : सध्याच्या या महागाईच्या जगात भविष्यात पैशाची चणचण लागू नये म्हणून आपण योग्य प्रमाणात पैशाची गुंतवणूक करत असतो. बँक एफडी, पोस्ट ऑफिस योजना, सरकारी योजना, म्युच्युअल फंड असे गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सर्वसामान्यांचा विश्वास हा बँकेवर जास्त असतो, त्यामुळे अनेकजण बँकेत फिक्स डिपॉजिट करत पैशाची गुंतवणूक करतात. ठराविक काळासाठी आणि विशिष्ट अशा व्याजदरामध्ये आपण गुंतवणूक करत असतो. तुम्ही सुद्धा बँकेत पैसे गुंतवणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशातील प्रसिद्ध बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी नवी FD स्कीम आणली आहे.

७.१५% वार्षिक व्याज- Earth Green Term Deposits

अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीम असे या योजनेचे नाव आहे. बँक ऑफ बडोदा या विशेष एफडीवर ७.१५% वार्षिक व्याज देत आहे. या गुंतवणुकीतून मिळणारा पैसा पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदाच्या ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही अटी आणि पात्रता निकष आहे. त्यानुसार. देशातील सर्वसामान्य नागरिक, रहिवासी भारतीय NRI आणि HNI गुंतवणूकदार या विशेष योजनेत पैशाची गुंतवणूक करू शकतात. तुम्ही जर बँक ऑफ बडोदाच्या अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजनेत पैसे गुंतवण्यास इच्छुक असाल तर देशभरातील कोणत्याही BOB शेहटुन तुम्ही अकाउंट सुरु करू शकता. या स्कीम अंतर्गत ग्राहकांना कमीत कमी ६.४० टक्के ते जास्तीत जास्त ७.१ टक्के व्याजदर मिळू शकतो.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ देवदत्त चंद यांनी या योजनेबद्दल माहिती देताना म्हंटल कि, ग्रीन टर्म डिपॉझिट स्कीमच्या माध्यमातून गुंतवणुकदारांना आर्थिक रिटर्न सुद्धा चांगल्या प्रमाणात आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे पैसेही सुरक्षित राहतील. अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिटद्वारे (Earth Green Term Deposits) जमा केलेला पैसा हरित प्रकल्प किंवा अक्षय ऊर्जा, स्वच्छ वाहतूक, शाश्वत पाणी आणि कचरा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता, हवामान बदल अनुकूलन, प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण, हरित इमारती, जैवविविधता यासाठी वापरला जाईल असेही त्यांनी सांगितलं.