Earth Like Planet | आपले विश्व खूप मोठे आहे. त्यातील केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आढळते. परंतु पृथ्वीशिवाय इतर कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आढळते का? कुठे ऑक्सिजन आणि पाणी मुबलक प्रमाणात आहेत का? याचा शोध मानव गेला अनेक वर्षापासून घेत आहे. परंतु आता शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर सापडण्याच्या दिशेने जात आहेत. कारण एका संशोधनातून असे संकेत देखील आलेले आहे. संशोधक हे सौरमालेबाहेरील जीवसृष्टी कोणत्या ग्रहावर आहे? किंवा कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी राहू शकते याचा शोध घेत आहे? नुकताच त्यांनी एक ग्रह (Earth Like Planet) शोधून काढला आहे. ज्या ग्रहावर बर्फ असल्याचे सांगितलेले आहे. या ग्रहाचे नाव LHMS 1140 B असे आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 48 प्रकाश वर्ष एवढा दूर आहे.
कसा आहे ग्रह ? | Earth Like Planet
LHMS 1140 B हा ग्रह लाल बटू ताऱ्याभोवती भ्रमण करत आहे. हा तारा आकाराने सूर्यापेक्षा खूपच लहान आहे. जीवसृष्टी या ग्रहावर तग धरू शकते. असा अंदाज बांधला जात आहे. या ग्रहावरील तापमान पाणी द्रव्य विस्तारित राहील एवढा आहे. त्यामुळे जीवनसृष्टी निर्माण होण्यास इथे चांगला वाव आहे.
या ग्रहाच्या वजनाबद्दल आणि त्याच्या भ्रमण कक्षाबद्दल पुरेशी माहिती आलेली आहे. त्यामुळे या ग्रहाला वातावरण आहे का? हे देखील तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे जर या गृहावर जीवसृष्टी तग धरेल असे वातावरण असेल? तर हा आतापर्यंतचा सगळ्यात जवळचा ग्रह म्हणता येईल. शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षापासून असा एकदा ग्रह शोधत होते आणि आखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे.
7 वर्षापेक्षा अधिक काळापासून संशोधन सुरू
2017 मध्ये पहिल्यांदा या ग्रहाचा शोध लागला होता. तेव्हापासून सगळेजण हा ग्रह सूर्यमालेतील नेपच्यून या ग्रहासारखा तर नाही? ना असा अंदाज तयार लावत होते. या ग्रहाचे मागील अनेक वर्षापासून मानवाने तयार केलेल्या शक्तिशाली दुर्बिणीतून निरीक्षण देखील करण्यात आलेले आहे. या निरीक्षणातून हा ग्रहण नेपच्यून प्रमाणे पूर्णपणे वायुने बनलेला नसल्याचे देखील स्पष्ट झालेले आहे. या ग्रहांमध्येवरील जवळपास 10 ते 20 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे असे देखील स्पष्ट झालेले आहे.