कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील काही भागात तसेच कोयना धरणाजवळ रविवारी सकाळी 9. 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2. 9 इतकी नोंदवण्यात आली आहे. सकाळी झालेला भूकंप कराड व पाटण तालुक्यातील लोकांना जाणवला आहे.
सदरील भूकंपाची माहिती पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. कराड व पाटण बरोबर भूकंपाचे धक्के सातारा परिसरात देखील जाणवल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सदरील भूकंपाचा धक्का हा साैम्य आहे. त्यामुळे त्यांचा केंद्रबिंदू काढण्यात आला नव्हता.
कोयना सिंचन विभाग गायब
सातारा जिल्ह्यात भूकंप झाल्यानंतर त्यांची माहीती कोयनानगर येथील कोयना सिंचन विभागाकडून मिळत असते. मात्र रविवार असल्याने कार्यालयातील दुरध्वनी उचलण्याच कोणी नसल्याचे दिसून आले. तसेच भूकंपाची माहिती तेथील अधिकाऱ्यांनाही नव्हती. त्यामुळे भूकंपाची माहीती मिळण्यास अनेकांना अडचण आली. तसेच अधिकारी वर्गालाही या भूकंपाची माहिती मिळण्यास उशीर झाला होता.