कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. आज शुक्रवारी दि. 22 रोजी दुपारी 1 वाजता 3 रिश्टेल स्केलचा भूकंप झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी तसेच अर्थिक हानी झालेली नसल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अोसरला आहे. मात्र रिपरिप सुरू असताना परिसरला भूकंपाचा धक्का बसला आहे. कोयनेपासून 12 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावच्या वरील बाजूस भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.
#कोयना परिसराला 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का… pic.twitter.com/WvX1or5eW5
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 22, 2022