पाटण | सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज मंगळवारी दि. 1 रोजी सकाळी 9.47 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरण परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
तसेच काहीवेळा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा परिसरासह सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवतो. मंगळवारी सकाळीही 9 वाजून 47 मिनीटांनी कोयना परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. कोयनेपासून 9.6 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर कोयना खोऱ्यातील काडोली गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटरवर केंद्रबिंदुचे अंतर आहे. या केंद्रबिंदूची खोली 5 किलोमीटर होती. हा भूकंप कोयनानगर परिसरातच जाणवला.
दरम्यान गेल्या महिन्यात 8 जानेवारीलाही कोयना परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता. कोयना धरणापासून 8 किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तर या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 नोंद इतकी झाली होती.