Easy Home Remedies : व्हॅक्सिंग करताना भाजलं तर करा ‘हे’ घरगुती उपाय; चट्टे, डाग दिसणार नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Home Remedies) शरीरावर नको असलेले केस काढण्यासाठी आधी रेझरचा वापर केला जायचा. पण आजकाल व्हॅक्सिंगचा वापर केला जातो. व्हॅक्सिंग करताना काही प्रमाणात वेदना होतात. मात्र व्हॅक्सिंगनंतर बराच काळ नको असलेले वाढत नाहीत. मुख्य म्हणजे रेझरच्या वापरानंतर अंगावर पुरळ येणे, खाज येणे किंवा कधी कधी त्वचेचे नसून होणे अशा समस्या होतात. मात्र, व्हॅक्सिंगचा वापर केल्यास अशा कोणत्याही समस्या जाणवत नाहीत.

व्हॅक्सिंगचे बरेच फायदेदेखील आहेत. जसे कि, डेड स्किन काढून टाकणे. याशिवाय टॅनिंग काढणे. यामुळे त्वचा आपोआप सुंदर दिसू लागते. असे असले तरीही व्हॅक्सिंग करताना वापरल्या जाणाऱ्या गरम व्हॅक्समूळे त्वचेला चटका लागतो. (Easy Home Remedies) यामुळे कधी कधी त्वचा पोळण्याची शक्यता असे. जर व्हॅक्सिंग करताना जराही निष्काळजीपणा झाला तर त्वचा भाजू शकते आणि यामूळे त्वचेवर चट्टे वा डाग येतात. तसे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने व्हॅक्स बर्न लवकर बरे होते.

1. थंड पाणी

व्हॅक्सिंग करताना भाजलं तर तो भाग लगेच थंड पाण्याखाली धरा. किमान १० मिनिटे थंड पाण्याखाली तसेच थांबा. यामुळे जळजळ कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूज किंवा चट्टे येणार नाहीत.

2. कोरफड जेल (Easy Home Remedies)

भाजणे, पोळणे अशा समस्यांवर कोरफडीचा गर वा जेल खूपच प्रभावीपणे काम करते. व्हॅक्सिंग करताना भाजलेल्या ठिकाणी कोरफड जेल लावल्यास सूज येत नाही. तसेच वेदना देखील कमी होतात. व्हॅक्सिंग करताना भाजल्यास आधी थंड पाण्याने ती जागा धुवून त्यानंतर किमान २ ते ३ वेळा कोरफड जेल लावा. यामुळे भाजलेल्या जागी डाग येणार नाहीत.

3. मध

व्हॅक्सिंग करताना भाजल्यास त्या भागावर नैसर्गिंकरित्या अँटीसेप्टिक आणि मॉइस्चरायजर म्हणून ओळखले जाणारे मध लावा. (Easy Home Remedies) यामुळे जखम होणार नाही. शिवाय संक्रमणापासून बचाव होईल.

4. खोबरेल तेल

व्हॅक्सिंग करताना भाजले वा पोळले तर त्या भागावर त्वरित खोबरेल तेल लावा. हे नैसर्गिकरित्या मॉइस्चरायजर असल्याने जखम होत नाही. जखम झाल्यास लवकर भरते आणि जळजळ थांबते.

5. बटाटा

व्हॅक्स बर्न बरे करण्यासाठी बटाट्याचा वापर करता येईल. कारण बटाट्यात असणारा थंडपणा हा जखम लवकर बरी करतो. शिवाय सूज येऊ देत नाही आणि मुख्य म्हणजे जळजळ लगेच थांबते. (Easy Home Remedies)