Easy Kitchen Tips : तुमचा सिलेंडर लवकर संपतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा, दरवेळेपेक्षा जास्त चालेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Easy Kitchen Tips) प्रत्येकाच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. सकाळचा नाश्ता ते रात्रीचे जेवण असा अख्खा दिवस गॅसचा वापर काही ना काही कारणामुळे सुरूच असतो. प्रत्यके सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात गॅस सिलेंडर अधिक काळ चालवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरु असतो. मात्र तरीही बऱ्याचवेळा गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. गॅस सिलेंडर लवकर संपल्यामुळे ऐनवेळी गृहिणींची मात्र चांगलीच भांबेरी उडते. तुमचाही गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो का? तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा.

कारण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकवू शकता. (Easy Kitchen Tips) अगदी छोट्या आणि सोप्या अशा या टिप्स तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे चुकूनही ही बातमी स्किप करू नका. चला तर जाणून घेऊया गॅस सिलेंडर बराच काळ टिकवण्याच्या टिप्स.

‘असा’ वाचवा सिलेंडर गॅस (Easy Kitchen Tips)

टिप 1 – अन्न शिजवताना मध्यम आचेवर शिजवावे. मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्यानेही खूप गॅस वापरला जातो आणि यामुळे अनेकदा पाईपमधून गॅस गळतीची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी सिलिंडरची तपासणी करा आणि गॅसची बचत करा.

टिप 2 – कोणताही पदार्थ शिजवताना शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करा किंवा भांड्यावर झाकण ठेऊन अन्न शिजवा. एकतर कुकरमध्ये लवकर अन्न शिजते आणि त्यामुळे गॅसची बचत होते. (Easy Kitchen Tips) तसेच भांड्यावर नेहमी झाकण ठेवल्यानेसुद्धा अन्न लवकर शिजते. ज्यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि तो जास्त काळ टिकतो.

टिप 3 – जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ बनवण्यासाठी भांडे गॅसवर ठेवाल, तेव्हा ते भांडे ओले नसेल याची काळजी घ्या. कारण, ओली भांडी गॅसवर ठेवल्याने ती सुकायला बराच गॅस वाया जातो. त्यामुळे भांडे गॅसवर ठेवताना स्वच्छ कापडाने कोरडे करून मग ठेवा.

टिप 4 – कोणतेही अन्न फ्रिजमधून काढून थेट गॅसवर ठेवू नका. (Easy Kitchen Tips) असे अन्न गरम करण्यासाठी गॅसचा जास्त वापर होतो आणि त्यामुळे गॅस लवकर संपू शकतो. अशावेळी, आधी अन्न फ्रिजबाहेर काढून ठेवा आणि रम तापमान नॉर्मल झाल्यानंतर गॅसवर गरम करा.

टिप 5 – तुम्ही जी गॅस शेगडी वापरता त्याचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा. कारण साफसफाई न केल्याने गॅस बर्नरमध्ये घाण जमा होते. परिणामी गॅस नीट जळत नाही आणि तो वाया जातो. बर्नरमध्ये ज्योतीचा रंग बदलल्याचे दिसल्यास बर्नरला स्वच्छतेची आवश्यकता आहे हे समजून घ्या. (Easy Kitchen Tips)