Friday, January 27, 2023

घाटी रुग्णालयातील कामगारांना कायमस्वरूपी करण्यासाठी खा. इम्तियाज जलीलसह आ. जैस्वाल यांना निवेदन

- Advertisement -

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथील कोविड योद्धे कथित कंत्राटी कामगार यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा या बाबतचे निवेदन गुरुवारी देण्यात आले. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक तर्फे खासदार इम्तियाज जलील व आमदार प्रदीप जैस्वाल यांना हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात आयटक संघटनेकडून रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 164 कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यांना कायमस्वरूपी तत्वावर घाटी रुगणालयात नियुक्त करावे अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करू अशा इशारा देखील आयटक संघटने कडून देण्यात आला आहे. दरम्यान ,कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने दर्शवली आहे. कंत्राटी कामगारांनी कोरोना महामारीमध्ये पीपीई किट घालून बारा तास काम केले असून. कोरोना महामारी मध्ये काम करत असताना या कामगारांकडे ओळखपत्र देखील नव्हते. त्यांना प्रशासनाकडून कुठल्याच सुविधा पुरवल्या गेल्या नाही.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटसमयी काळात या कामगारांनी काम केले. त्यांना न्याय द्यावा अशी मागणी राज्य सेक्रेटरी अभय टाकसाळ यांनी केली आहे. यावेळी, विकास गायकवाड, रतन अंबिलवादे, भालचंद्र चौधरी, महेंद्र मिसाळ,किरणराज पंडित , अभिजीत बनसोडे, आतीष दांडगे, मुकुल म्हस्के, नंदाबाई हिवराळे, नीता भालेराव, कविता जोगदंडे यांच्या सहया आहेत.