हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Eating Pointed Gourd Benefits) तुम्ही रोजच्या आहारात काय खाता? याचा तुमच्या आरोग्यावर विशेष परिणाम होत असतो. त्यामुळे तज्ञ सांगतात की, आहार पूर्ण आणि सकस हवा. पण बिघडत्या जीवनशैलीमूळे चुकीच्या आहाराचे सेवन केले जाते. ज्यामुळे सतत आजारपण येतं. तुम्हीही सारखे आजारी असता का? तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे असे समजा. कारण, आज आपण एका अशा फळभाजीची माहिती घेणार आहोत. जी नियमित आहारात असेल तर तुम्ही बऱ्याच आजारांवर मात करू शकता. या भाजीचे नाव आहे तोंडली. चला तर तोंडलीतील पौष्टिक घटक आणि ते खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
आरोग्यवर्धक तोंडली (Eating Pointed Gourd Benefits)
आपल्या आहारात हिरव्या भाज्या जितकी फायदेशीर भूमिका निभावतात तितकेच फायदे फळभाज्या देखील देतात. त्यापैकी एक म्हणजे तोंडली. ही फळभाजी अत्यंत लोकप्रिय भाज्यांपैकी एक असून शरीरासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरते. परवलसारखी दिसणारी ही फळभाजी आकाराने थोडीशी लहान आणि मऊ असते. यात अनेक पोषक घटक आहेत.
(Eating Pointed Gourd Benefits) तोंडलीच्या भाजीत खनिज, लोह, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी २, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर तोंडली खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
हृदय निरोगी राहते
तोंडलीच्या भाजीत अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. जे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्याचे काम करतात. तोंडलीतील फ्लेव्होनॉइड्स, अँटी इम्फेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म हृदय आणि रक्त वाहिन्यांसंबंधी समस्या वाढवणारे फ्री रॅडिकल्स कमी करतात. (Eating Pointed Gourd Benefits) यामुळे हृदयाचे संरक्षण होते आणि परिणामी मोठमोठ्या आजारांचा धोका टळतो.
पचनप्रक्रिया सुरळीत होते
तोंडलीच्या भाजीत फायबरचे प्रमाण बरेच असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया सुधारते. परिणामी बद्धकोष्ठता, अपचन, ॲसिडिटीची समस्या होत नाही. यामुळे आपल्या आहारात जर तोंडलीचा समावेश असेल तर पचनक्रिया सुरळीत होऊन पोटाचे इतर त्रास होत नाही.
डोळ्यांची दृष्टी वाढवते (Eating Pointed Gourd Benefits)
तोंडली या फळभाजीतील व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन हे घटक डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. जे मोतीबिंदूसारख्या आजरापासून डोळ्यांची काळजी घेतात आणि दृष्टी वाढवतात.
वाढत्या वजनावर नियंत्रण
आजकाल वजन वाढण्याची समस्या बऱ्याच लोकांमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात तोंडलीचा समावेश करा. तोंडलीत फायबरचे प्रमाण अधिक असते. (Eating Pointed Gourd Benefits) त्यामुळे तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण राखणे सोपे जाते. परिणामी अनावश्यक खाणे बंद होते आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते.