हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फक्त भारतातच नव्हे तर परदेशामध्येही मासे खाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांना तर खाद्यपदार्थांमध्ये चिकनऐवजी मासे खायला (Fish Food) सर्वात जास्त आवडतात. यामध्ये माशांचे विविध प्रकार चाखायची सवय देखील अनेकांना असते. परंतु यातीलच काही मासे शरीरासाठी घातक ठरू शकतात. हे मासे आपल्या शरीरामध्ये एका विषासारखे काम करतात. हे मासे नेमके कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात.
मोठा मांगूर – मांगूर मासा खायला अनेकांना आवडत असला तरी तो शरीरासाठी घातक ठरू शकतो. यातील तुम्ही लहान मांगूर मासा खाऊ शकता. कारण की जे मोठे मासे असतात त्यांची वाढ काही विषारी हार्मोन्स देऊन करण्यात येते. हेच मासे आपण खाल्ल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो.
तिलापिया – तिलापिया माशांमध्ये हानीकारक चरबी असते. हा मासा खाल्ल्यानंतर मनुष्याच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकार आणि इतर आजार उद्भवू शकतात. तसेच दमा, संधिवात असे त्रास होण्यास सुरुवात होऊ शकते. यामुळे शक्यतो हा मासा खाणे काळात.
टूना फिश – टूना फिशला हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन देण्यात येते. परदेशामध्ये ही फिश जास्त प्रमाणात खाल्ली जाते. परंतु तुम्हाला देखील ही फिश आवडत असेल तर याचे प्रमाण नक्कीच कमी करा. खास करून गर्भवती महिलांना हा मासा खायला देऊ नका. हा मासा खाल्ल्यानंतर
पोटामध्ये पारा जमा होतो.
बांगडा – माशांचा राजा म्हणून बांगडा मासा ओळखला जातो. परंतु हाच मासा तुम्ही सारखा खात असाल तर तुमच्या पोटामध्ये पारा जमा होईल. बांगडा मासा सतत खाणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे मासे खायचे प्रमाण तुमचे लिमिटमध्ये ठेवा.