नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 23 वर्षीय एलिना रिबाकिना (Elena Ribakina) हि विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. एलिना रिबाकिनाने (Elena Ribakina) विम्बल्डनच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओन्स जबेउरचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावलं आहे. दोन तासांपेक्षा जास्त काळ रंगलेल्या या लढतीत रायबाकिनानं (Elena Ribakina) 3-6, 6-2, 6-2 असा विजय मिळवला. या विजेतेपदासह ती ग्रास कोर्ट स्लॅम जिंकणारी कझाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे. कझाकिस्तानच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला एकेरी खेळाडूने एकेरी गटात कोणतेही मोठे विजेतेपद जिंकले नव्हते. रिबाकिना (Elena Ribakina) एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारी पहिली कझाक टेनिसपटू ठरली आहे.
The calmest Wimbledon celebration in history? 🧊
All business for Elena Rybakina… #Wimbledon | #CentreCourt100 pic.twitter.com/mSBot25dmX
— Wimbledon (@Wimbledon) July 9, 2022
अंतिम सामन्यात काय घडले ?
ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि SW19 मधील क्रोकेट क्लबच्या आयकॉनिक सेंटर कोर्टवर एलिना रिबाकिना आणि ओन्स जबेउर यांच्यात विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. हा सामना जवळपास दोन तास चालला. या सामन्याच्या तिसर्या गेममध्ये रिबाकिनाची (Elena Ribakina) सर्व्हिस तोडून जबेउरनं जोरदार सुरुवात केली पहिल्या गेममध्ये ब्रेक घेत दुसऱ्या सेटमध्ये दमदार सुरुवात करून रिबाकिनाने (Elena Ribakina) सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत जोरदार पुनरागमन केलं तिनं सुरुवातीच्या दमदार कामगिरीचा सदुपयोग करत पहिला सेट 6-3 असा जिंकला.
यानंतर कझाकिस्तानच्या या स्टारने दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा जबेउरची सर्व्हिस मोडून सामन्यात बरोबरी साधली आणि हा सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. तिसऱ्या सेटमध्ये दुसऱ्या प्रमाणेच सुरुवात करत 23 वर्षीय खेळाडूनं पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्यांची दोनदा सर्व्हिस मोडून सेट 6-2 असा जिंकला. याबरोबर एलिना रिबाकिना (Elena Ribakina) आपल्या कारकिर्दीतले पहिले एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले. तसेच या सामन्यात पराभूत झालेल्या ओन्स जबेउरनेसुद्धा इतिहास रचला. ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली अरब आणि आफ्रिकन महिला ठरली आहे.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार