आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगोला : हॅलो महाराष्ट्र – काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच, असं म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (mla shahaji bapu patil) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ते काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत झालेल्या संभाषणातील त्यांचा हा डायलॉग काही दिवसातच महाराष्ट्रभर व्हायरल झाला. हा डायलॉग नुसता फेमस नाही झाला तर त्यावर एक गणेसुद्धा आले तेदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. शहाजी पाटलांच्या (mla shahaji bapu patil) या दमदार कामगिरीचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आहे. यानंतर आता सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील (mla shahaji bapu patil) पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले होते. अशा तणावपूर्ण वातावरणात आमदार कशी मजा करत आहेत, हे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील (mla shahaji bapu patil) यांच्या संभाषणावरुन पहायला मिळालं. यावेळी शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे आज सांगोल्यात जल्लोषात स्वागत त्यांच्या चीक महूद या गावी करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. फटाक्यांच्या आतषबाजी आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी त्यांचे एकदम जल्लोषात स्वागत केले.

एकनाथ शिंदेंनी केलं होतं कौतुक
शहाजी बापू पाटील यांच्या या वाक्याची खुद्ध एकनाथ शिंदे यांना भुरळ पडली नसती तरच नवल होतं. आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंच त्यांनी मनापासून कौतुक केलं होतं. यावेळी शिंदे यांनी पाटील यांना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. मग काय शहाजी पाटलांनी (mla shahaji bapu patil) एकनाथ शिंदेंसमोर हे वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवलं. तसंच हे वाक्य किती व्हायरल झालंय आणि त्याची लोकांनी गाणी तयार केली हे देखील त्यांना दाखवून दिलं.

शहाजीबापू पाटलांनी का केले बंड ?
माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला आहे. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असे शहाजीबापू पाटील (mla shahaji bapu patil) यांनी सांगितले होते.

हे पण वाचा :
‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद

Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!!

कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!

Leave a Comment