नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना देशातील काही राज्यांमध्ये निवडणूका झाल्या आहेत. एवढेच नाही तर निवडणुकांकरिता मोठ्या प्रमाणात रॅली आणि प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यावरून हाय कोर्टाने इलेक्शन कमिशन वर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता इलेक्शन कमिशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २ मे नंतर निवडणुकांचे निकाल लागणार आहेत तेव्हा विजय मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे.
No victory procession after the counting on 2nd May shall be permissible. Not more than 2 persons shall be allowed to accompany the winning candidate or his/her authorised representative receive the certificate of election from the Returning Officer concerned: EC pic.twitter.com/fT3T3wvHUj
— ANI (@ANI) April 27, 2021
याबाबत निवडणूक आयोगाने सांगितले आहे की , 2 मे रोजी मतमोजणीनंतर कोणतीही विजय मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. विजयी उमेदवार किंवा त्याच्या / तिच्या अधिकृत प्रतिनिधीसह 2 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान हे नियम प. बंगाल , आसाम, तामिळनाडू , केरळ , पॉण्डेचरी इथे प्रकर्षाने लागू असतील असे सांगण्यात आले आहे.
भाजपा चुनाव आयोग द्वारा परिणामों के बाद विजय जुलूस पर प्रतिबंध के फ़ैसले का स्वागत करती है।मैंने भाजपा की सभी राज्य इकाइयों को इस निर्णय का पालन करने का निर्देश दिया है। हमारा हर कार्यकर्ता पूरी ऊर्ज़ा के साथ इस संकट की घड़ी में आम जन की सेवा में निरंतर लगा रहेगा: जे.पी नड्डा,BJP pic.twitter.com/7yZdChkRQU
— ANI_HindiNews (@AHindinews) April 27, 2021
दरम्यान या निर्णयाचे स्वागत भाजप पक्षाकडून करण्यात आले आहे. ‘ निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले असून, मी भाजपच्या सर्व राज्य घटकांना या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आमचे प्रत्येक कार्यकर्ते या संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या सेवेत निरंतर कार्यरत राहतील’ अशी माहिती ट्विट करत जेपी नड्डा यांनी दिली आहे.
हायकोर्टाची निवडणूक आयोगावर नाराजी
संपूर्ण देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना सभा, रोड शो ला मान्यता दिल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने इलेक्शन कमिशनच्या अधिकार्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. देशात दररोज साडेतीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. असे असताना अनेक राजकीय नेते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एकत्रित करून मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत.