सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- पुणे महामार्गावर चारचाकी इको कारचा टायर फुटल्याने समोर चालणाऱ्या बुलेटवर आदळली. यामध्ये कार पलटी होऊन डिवाडरला धडकल्याने त्यामधील दोन महिलासह चालक आणी बुलेटस्वार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहितीच भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,की जिता (ता. पेण. जि. रायगड) येथील रहिवासी असलेले अंजना विकला म्हात्रे (वय- 43), रतन किशोर ठाकुर (वय- 52), किशोर केशव ठाकुर (वय-59), विलास शिवाजी म्हात्रे (वय-45) अशी जखमींची नावे आहेत. इकोकार क्रमांक (एम. एच.06 ऐ. झेड 1933) मधुन कराड येथे औषधे ऊपचारासाठी निघाले असता, त्यांची कार भुईंज (ता.वाई) गावच्या हद्दीतील भुईंज पोलिस ठाण्यापासुन 200 मिटर अंतरावर सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी आली असता. कारचा पाठीमागील चालक बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार समोर चालत असणाऱ्या बुलटवर कार जाऊन आदळली.
बुलेटस्वार निलेश श्रीपाल मुगदुम (वय- 44 रा. पुणे) महामार्गावर फरफटत गेला. कार डिव्हायडरला जाऊन धडकून ती पलटी झाली. कारमधील आणी बुलेटस्वार असे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना भुईंज पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सातारा येथील सातारा हॉस्पिटलमध्ये ऊपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.