हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यभरात ईडीकडून छापेमारी केली जात आहे. आज सकाळी ईडीच्यावतीने नागपुरात छापेमारी करण्यात आली असून रामदास पेठ परिसरात आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांच्या घरावर आणि ऑफिसवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.
नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांच्याकडून आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. आज सकाळी रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक पोहचले. या पथकाने अग्रवाल यांचे घर आणि ऑफिस ताब्यात घेतले असून सकाळपासून या ठिकाणी चौकशीचे सत्र राबविले जात आहे.
रामदेव आग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम आहे. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल माहिती दिलेली नाही. सकाळपासून अग्रवाल यांचीही चौकशी केली जात आहे.