हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीने समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. पण कप्तान मलिक यांनी मात्र ही गोष्ट फेटाळली आहे.
मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही असे कप्तान मलिक यांनी स्पष्ट केले. मलिक कुटुंबियांना कितीही दाबलं तरी थांबणार नाही. आमचा अंडरवर्ल्ड शी कोणताही संबंध नाही. जर मलिकांवरील आरोप सिद्ध झाला, तर या गांधीच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून लोकांना आम्ही बोलणार गोळी मारा. असेही कप्तान मलिक यांनी म्हंटल.
ED summons Kaptan Malik, Nawab Malik's brother in connection with Dawood Ibrahim money laundering case.
Nawab Malik has been remanded to ED custody till March 3, in the case
— ANI (@ANI) February 24, 2022
दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी ची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राज्यातील महाविकास आघाडी कडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मलिक यांच्या राजीनाम्याचा जोर धरला आहे.