हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. आपल्याकडे कोणताही सण असला की, अनेक गोडधोड पदार्थ होतात. नवनवीन पदार्थ होतात. त्यात दिवाळीत म्हणलं तर काही विचारूच नका. दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थ बनवले जातात. लाडू, चकली, चिवडा, करंज्या, शंकरपाळ्या हे पदार्थ मोठ्या आवडीने बनवले जातात. परंतु यावर्षी गृहिणींचे दिवाळी बनवण्याचे बजेट थोडेसे घालणार आहे. कारण यावर्षी डाळी आणि तेलांच्या दरात मागील महिन्याच्या तुलनेत ज्या महिन्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आणि ऐन सणासुदीत महागाईची चिंता वाढलेली आहे.
दसरा दिवाळी हे सन लागू पाठ आलेले आहेत आणि सणासुदीच्या काळात आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. त्यामुळे किराणामालांच्या वस्तूंची मागणी देखील वाढते. तसेच केंद्र सरकारने आयात शुल्क 12.5 वरून 32.5% केले आहे. सणाच्या आधी रवा, बेसन, खारीक, खोबरे, शेंगदाणा यांसारख्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या दरात वाढ झालेली आहेम खाद्यतेल, खोबरे, नारळ, चणाडाळ, बेसन, पोहे यांच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. तसेच तेलाचे भाव देखील वाढलेले आहेत. सध्या शेंगदाणा तेलाचे भाव हे प्रति किलो 175 रुपये एवढे आहे. सोयाबीन तेलाचे भाव हे 144 सूर्यफूल तेलाचे 146 रुपये प्रति किलो आहे. तसेच सरकी तेलाचे दर हे 148 रुपये प्रति किलो आहे.
यासोबत डाळींच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सध्या हरभरा डाळीचे दर हे 110 रुपये प्रति किलो एवढे आहे. मटकीची डाळी 120 रुपये प्रति किलो एवढी आहे. तुरडाळ ही 180 रुपये किलो एवढी आहे. मूग डाळ 130 रुपये किलो मसूर डाळ 100 रुपये किलो, त्यामुळे या सणासुदीत जीवन उपयोगी वस्तूंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे.