युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही, मोदींच्या सभेपूर्वी ‘ते’ बॅनर चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi In pune) यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार असे ४ उमेदवार आहेत. त्यामूळे पुण्यातील मोदींची सभा महत्वपूर्ण ठरणार असून या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.मात्र या सभेपूर्वीच आयुष दीपक कांबळे नावाच्या एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकरने लावलेले बॅनर चर्चेत आलं आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीवर या तरुणाने मोदींना थेट सवाल केला आहे.

बँनरवर नेमकं काय लिहिले आहे –

निर्यात बंदी अस महागाई असो, बेरोजगार असो, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याचा, मायमाऊलीचा, युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. तसेच या बॅनर खाली आयुष दीपक कांबळे – एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर अस नाव सुद्धा टाकण्यात आलं आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

याबाबत आयुष दीपक कांबळेने माध्यमांशी बोलतांना सांगितले, ‘मी वानवडी भागात राहत असून पदवीधराचे शिक्षण घेतलं आहे. मी अनेक ठिकाणी काम मिळावे, यासाठी अर्ज केले. मात्र काही काम लागले नाही. त्यामुळे मी टेम्पो चालविण्यास सुरुवात केली आहे. पण एवढं शिक्षण घेऊन देखील आपल्याला काम मिळत नसेल तर काय करायचे. मागील दहा वर्षात देशातील कोणत्याही वर्गासाठी काम केले नाही.मोदींनी केवळ उद्योग पतींसाठीच काम केलं आहे . त्यामुळे फ्लेक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्याचे त्याने सांगितले.