नवी दिल्ली । आपण जी स्वप्ने पाहतो ती केवळ चांगल्या शिक्षणाच्या जोरावरच पूर्ण होऊ शकतात. मात्र सध्या शाळा, महाविद्यालयांसह सर्वच शैक्षणिक संस्थांच्या शुल्कात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत अभ्यास करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. मात्र एज्युकेशन लोन आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहे. मुलींसाठी एज्युकेशन लोन मुलांपेक्षा कमी व्याजदरात उपलब्ध आहे. कोणत्या बँकेकडून कोणत्या दराने एज्युकेशन लोन घेता येईल हे जाणून घेउयात.
मुलींच्या चांगल्या शिक्षणासाठी सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मुलींच्या उत्कर्षासाठी सुकन्या समृद्धी योजना आणली आहे, त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल, तर एज्युकेशन लोनचे व्याजदर मुलांच्या तुलनेत 0.50% कमी ठेवण्यात आले आहेत.
कोणती बँक किती व्याजावर एज्युकेशन लोन देते
– स्टेट बँक ऑफ इंडिया SBI लोन स्कीम – 8.65%
– कॅनरा बँक विद्या सागर स्कीम (7.5 लाखांपेक्षा जास्त) – 8.00%
– कॅनरा बँक विद्या शक्ति स्कीम (जास्तीत जास्त 7.5 लाख) – 6.40%
– बँक ऑफ इंडिया एजुकेशन लोन (7.5 लाखांपेक्षा जास्त) – 9.25%
– पीएनबी सरस्वती, पीएनबी उड़ान (10 लाखांपर्यंत ) – 9.75%
– पीएनबी कौशल लोन (1.50 लाखांपर्यंत) – 8.50%
– बँक ऑफ महाराष्ट्र मॉडल एज्युकेशन लोन स्कीम (7.5 लाखांपेक्षा जास्त) – 7.95%
वरील व्याजदरांवर, मुली किंवा महिला अर्जदारांना 0.50% कमी व्याजदरात सूट मिळते.