आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा; कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक

अंगणवाडी महिलांना दिलेली भाऊबीज शिमगा आला तरी दिला जात नाही. तालुका व जिल्हा प्रशासनाच्या गैरसोयीमुळे अंगणवाडी शिक्षिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन एक सांगत आहे आणि प्रशासन एक सांगत आहे. त्यामुळे अंगणवाडी महिलांची आर्थिक कोंडी होत असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.आप्पा पाटील यांनी व्यक्त केलं.

निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट … Read more

भारतातील परिस्थिती दुःखद, निर्वासितांनाही मोठं व्हायचा अधिकार आहे – सत्या नाडेला

बांगलादेशमधून आलेला एखादा निर्वासित भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली.

युवाशक्तीने पुनरुज्जीवीत झाली विदर्भ पर्यावरण परिषद

विदर्भ पर्यावरण परिषदेत तरुणाई मोठ्या उत्साहाने आणि जोमाने सहभागी झाली.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

कायद्याच्या जागरूकतेसाठी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न

कराड : तालुक्यातील कापील या गावी मोफत कायदेशीर सल्ला शिबीर संपन्न झाले. कायदादूत ग्रुप व कराड तालुका सेवा प्राधिकरण मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात माहिती अधिकार,शेतीच्या सात बाऱ्या संबंधी नियम, लोक न्यायालय, वाहतुकीचे नियम यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. सरोदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सद्यस्थितीत महिलांवरचे … Read more

व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं ही गरज नाही तर जबाबदारी – अनुराधा पाटील

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या अनुराधा पाटील यांचा शुक्रवारी सर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी चालू घडामोडींवर प्रभावी, मुद्देसूद भाषण केलं.

१२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने – परिवर्तनाचे वाटसरु

राष्ट्रीय युवक दिवस हा एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तर त्यामागे एक प्रेरणा आहे युवकांना स्वतःमधील शक्ती ओळखण्याची, त्याला दिशा देण्याची..!!

‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

नव्या लढ्यासाठी मी सज्ज, आता एक इंचभरही मागे हटणार नाही – आयशे घोष

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..!! आता मी सुरक्षित असून परत आले आहे. नवीन लढ्यासाठी पुन्हा सज्ज होऊन..!! या लढ्यात आता एक इंचभरही मागे हटणार असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशे घोष हिने व्यक्त केलं आहे.