कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! यंत्र इंडिया लि. अंतर्गत ‘या’ पदांसाठी मेगाभरती

yantra india limited

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी उत्तीर्ण असलेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Government Jobs) एक आनंदाची बातमी आहे. यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे रिक्त पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना जरी करण्यात आली असून तब्बल 5450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने … Read more

मंदीची सुरुवात? कंपनीच्या मेलने कर्मचाऱ्यांच्या पोटात गोळा

verily comapny

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्फाबेट कंपनीची एक उपकंपनी वेरिलीने (Verily) आपल्या 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. लिंक्डइन (LinkedIn) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सीएनबीसीने (CNB) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने सुमारे 240 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील बिघडत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेदरम्यान आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून … Read more

आदर्शवत : केसुर्डी गाव कारभाऱ्यांनी केला स्त्रीचा सन्मान, अन् पायपीट थांबली

Kesurdi Gram Panchayat

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नायगाव (ता. खंडाळा) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. सरपंच व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील 30 शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींची पायपीट थांबणार आहे. केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास … Read more

महाविद्यालये, विद्यापीठांनी एकाच वेळी दुहेरी पदवी मिळविण्याची प्रक्रिया सोप्पी करावी- UGC

UGC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. यूजीसीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन शैक्षणिक कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. या आदेशानंतर, विद्यापीठांना अशा अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश देण्यात … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांना अंगणवाडी सेविकांचे निवेदन

Anganwadi workers

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत, प्रचंड महागाई आहे, आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे. सन 2018 पासून गेली 5 वर्षे अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही. तेव्हा वेतनवाढ करावी अशी, मागणी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी केली आहे. आ. बाळासाहेब पाटील यांना निवदेन … Read more

शेतकर्‍याच्या पोरीचा नादच न्हाय! पायात शूज घालून पळण्याचा सराव नसल्यानं अनवानी धावून मिळवलं सुवर्णपदक

Running Without Shoes

कराड | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची धमक असते. घरच्या परिस्थितीमुळे अनेकदा काहीजणांना शालेय जीवणात मोठा संघर्ष करुन शिकावं लागतं. शेतकरी कुटूबांतील मुलं- मुली तर अभ्यासासोबत मैदानी खेळांमध्येही तरबेज असतात. याचाच प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वाठार (ता. कराड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या दानशूर बंडो गोपळा कदम उर्फ मुकादम तात्या विद्यालयात आला आहे. पायात शूज नसल्याने … Read more

Bank Of Baroda मध्ये नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Bank of Baroda

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (BOB Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) पदाच्या एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. 24 जानेवारी 2023 … Read more

कृष्णा वैद्यकीय विद्यापीठ आता बनले ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ : डॉ. सुरेश भोसले

Krishna World University

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील एक महत्वाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम राबविण्याच्या उद्देशाने बदलण्यात आलेल्या या नामकरणास, भारत … Read more

BSNL Recruitment 2023 : BSNL मध्ये तब्बल 11705 जागांवर मेगा भरती; काय आहे पात्रता?

BSNL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत संचार निगम लिमिटेडने रिक्त पदांसाठी (BSNL Recruitment 2023) मेगा भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीअंतर्गत कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO) पदाच्या तब्बल 11,705 जागा भरल्या जाणार आहेत. लवकरच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. संस्था – भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited) पद … Read more