UPSC परीक्षेत साताऱ्याच्या ओंकारचा डंका!! देशात 380 वा क्रमांक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील माणचा सुपुत्र ओंकार राजेंद्र गुंडगे याने यूपीएससी परीक्षेत देशात 380 वा पटकावत देदीप्यमान यश मिळवलं आहे. ओंकारच्या या यशामुळे मानची माती भौतिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आली आहे. दुष्काळी माणदेश मधील पहिला युपीएससी पास होणार विद्यार्थी ठरला आहे. ओंकारच्या या यशामुळे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

आज खूप आनंद झाला, खूप दिवसापासून हि गोष्ट अडकली होती. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाच्या खूप अपेक्षा होत्या. माझ्यामुळे इतकं लोकांचं चांगलं कस होईल लक्ष्य असेल असे ओंकार म्हणाला, ओंकारला त्याच्या यशाच्या रहस्याबद्दल विचारलं असता त्याने सांगितलं की, अभ्यासाच्या तयारीला मी दिल्लीला गेलो होतो. आठ तास अभ्यास व एक तास व्यायाम तसेच खेळायला वेळ देत आरोग्याची विशेष काळजी घेतली. या परीक्षेसाठी वेगळं काही करायला लागत नाही फक्त शिस्त ठेवा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल असं ओंकारने सांगितलं.

दरम्यान, ओंकारच्या काकांनीही यावेळी प्रतिक्रिया देत त्याच्या या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केलं. यूपीएस पास झालेला ओंकार हा दहिवडीतील पहिलाच मुलगा आहे. ओंकारच्या यशामुळे दहिवडी आणि माणच्या लोकांना आनंद झाला आहे. त्याच्या हातून चांगली देशसेवा घडेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.