घाटीत आणखी आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; बाहेरील जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद, दि.२०: कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढत चालली आहे. घाटीत आणखी आठ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे घाटी प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यात सहा रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील असून दोन रुग्ण बीड आणि जळगाव जिल्ह्यातील आहे.

घाटी रुग्णालयात मृत्यू झालेल्या आठ रुग्णामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील जैतखेडा येथील ६९ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कैसर कॉलनी औरंगाबाद येथील ५५ वर्षीय स्त्री, टाऊन हॉल, आनंदनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, जुना बाजार येथील ७६ वर्षीय स्त्री, जुना बाजार, हेड पोस्ट ऑफिस येथील राहणारा ७० वर्षीय पुरुष आणि पोस्ट ऑफिस औरंगाबाद येथील ४५ वर्षीय स्त्री रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याशिवाय बीड जिल्ह्यातील माजलगाव, इरला येथील ६५ वर्षीय स्त्री रुग्ण तर जळगाव, खांदे दरवाजा येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णांचा घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत घाटी रुग्णालयात कोरोनामुळे १ हजार ११४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची नोंद घाटी रुग्णालयात करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment