शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज घेताना ‘ही’ अट नसणार सक्तीची; मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये सर्वत्र पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बाबत सरकारकडून नवनवीन माहिती आणि योजना येतच असतात. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणलेली आहे. महाराष्ट्रात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना नेहमीच पाठिंबा देत असते. त्याचप्रमाणे बँक देखील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करत असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकेने चांगले कर्ज द्यावे, असे आव्हान देखील एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे.

बँकांच्या समिती बाबत 163 व्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना त्यांच्या सिबिल स्कोरबाबत कोणतीही सक्ती केली जाऊ नये. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा सहकारी बँका प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण करण्याकडे प्राधान्य दिले जावे. हा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.

यावेळी 2024 – 25 साठीच्या 41 हजार 286 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा देण्यास मान्यता देखील दिलेली आहे. तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आरबीआय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. महाराष्ट्र कृषी प्रधान आणि प्रगतशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केलेले आहेत. आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. परंतु निसर्गाच्या कोपामुळे त्यांच्यावर संकट येते. अशावेळी आम्ही शासन म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो. बँकांना त्यांना संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्यांना अन्न मार्गाने पैसा उभा करावा लागतो. त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. शेतकरी जगला तरच आपण सगळे जाऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.”

या बैठकीत फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, महसूल मंत्री विखे पाटील, सहकार मंत्री वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली. यावेळी सहकारी बँकांचे बळकटीकरण शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.