…तर मलाही तोंड उघडावं लागेल ; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Eknath Shinde Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातील मुलाखतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी याबाबत प्रतिक्रिया देत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “तुम्ही आमच्या विरोधात बोलत असाल तर आम्हीही गप्प बसणार नाही. मी जर मुलाखत दिली आणि तोंड उघडलं तर राज्यात भूकंप होईल,” असा इशारा शिंदेंनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मालेगाव येथे विविध कार्यक्रमांचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. गद्दारी आम्ही केली, विश्वासघात आम्ही केला, असा आरोप त्यांनी आमच्यावर केला. मात्र, ज्या बाळासाहेबांनी राष्ट्रवादी, काँग्रेसला बाजूला ठेवले. त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी कुणी जवळ केले? मग गद्दारी कुणी केली ते सांगावे? असा सवाल शिंदे यांनी केला.

धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्य करत आहोत. आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे न्यायची आहे. तर दिघे यांच्याबाबत काय राजकारण झाले. याचा खुलासा लवकरच करणार करेन, असे शिंदे यांनी यावेळी म्हंटले.

मुलाखतीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. “तुम्हाला शिवसेनाप्रमुख व्हायचे आहे? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वत:ची तुलना करायला लागलात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना विचारला होता. तसेच तुमच्यात कर्तृत्व नाही आहे, तुमच्यात हिंमत नाही आहे. तुम्ही मर्द नाही आहात. तुम्ही विश्वासघातकी आहात, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे आणि शिंदे समर्थकांवर निशाणा साधला आहे.