मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Eknath Shinde Yashwantrao Chavan Pritisangam Ghat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड येथील प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाधीस्थळाची त्यांनी पाहणीही केली.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रीतिसंगम समाधीस्थळाची व कृष्णा-कोयना नदी संगमाची पाहणी केली. तसेच पर्णकुटी या समाधी स्थळावरील ग्रंथालयास भेट देत भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कराड येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.